आरती श्री तुळसी मातेची
विष्णुप्रिया वृंदावनजींची
आरती श्री तुळसी मातेची ...
सुरवर मुनीजन महिमा गाती
नारद शारद शीश नमविती
सर्व मिळूनी जयकार हो करती
तुळसी मातेची आरती गाती
आरती श्री तुळसी मातेची
विष्णुप्रिया वृंदावनजींची
आरती श्री तुळसी मातेची ...
निशदिन प्रेमाने जल जो अर्पितो
अरोग्य आनंद सहज मिळवितो
प्रभु हृदयी विराजितो
भक्ति फळाचा आनंद घेतो
आरती श्री तुळसी मातेची
विष्णुप्रिया वृंदावनजींची
आरती श्री तुळसी मातेची ...
तूळसी सेवन नित्य जो करतो
बळ बुद्धि आणि तेज वढवितो
तुळसी सर्व रोग मिटवी
घरोघरी सुख समृद्धि आली
आरती श्री तुळसी मातेची ...
तुजविण हरिला भोग ना आवडे
प्रभु हृदयीं प्रेम हो वाढे
बने प्रभुची दिव्य प्रसादी
मिळे ज्याला तो धन्य होई
आरती श्री तुळसी मातेची ...
तुळसी माळा ज्याच्या कंठी
प्रभु नामाचा गजर हो मुखी
यम भीतीतून मुक्ति मिळवी
पुण्य पवित्रता शुभ गती मिळवी
आरती श्री तुळसी मातेची ...
बापूजींनी संकल्प केला
तुळसी महिमा जगाने ओळखिला
घरोघरी लाविली तुळसी
मना मना मध्ये प्रभुंची प्रीती
आरती श्री तुळसी मातेची ...
माह डिसेंबर 25 येता
तुळसी पूजन करितो साजरा
तो नर अमिट पुण्यफळ मिळवी
जीवन आपले धन्य बनवी
आरती श्री तुळसी मातेची ...