विट्ठल विट्ठल विट्ठला विट्ठल विट्ठल विट्ठला...
मी हिंडलो ज्याच्यासाठी ते आले मझ्यासाठी
सोबत माझ्या अशी राहते जशी हो सावली
गुरु माऊली माझी गुरु माऊली....
विट्ठल विट्ठल विट्ठला विट्ठल विट्ठल विट्ठला...
तुम्ही नेहमी सोबत माझ्या पण ऐकत नाही मन
अहो राहून राहून करतो तुझी आठवण
रडक्या बाळाची हाक ऐकुनी आई धावली
गुरु माऊली माझी गुरु माऊली....
विट्ठल विट्ठल विट्ठला विट्ठल विट्ठल विट्ठला...
तुझ्या चरणी प्रीती आहे जीवनाचे आधार
राहू तुझ्यापाशी तू आम्हा कर स्वीकार
भक्तांनी तुझ्या या किती वाट पहिली
गुरु माऊली माझी गुरु माऊली....
विट्ठल विट्ठल विट्ठला विट्ठल विट्ठल विट्ठला...
मनाच्या मंदिरात आहे गुरुमूर्ती
सकाळ सन्ध्याकाळ करू त्याची आरती
ठाव नाही मला देव पावला की देवी पावली
गुरु माऊली माझी गुरु माऊली....
विट्ठल विट्ठल विट्ठला विट्ठल विट्ठल विट्ठला...
No comments:
Post a Comment