सांज सकाळी एकच काम
करू तुझी पूजा घेऊ तुझे नाम...
गुरू नामचा लागला छंद
गुरू प्रेमाचा वाहे सुगंध
विकारांनी घेतला पूर्ण विराम
करू तुझी पूजा घेऊ तुझे नाम...
सुटले हो सारे नातेगोते
कळले मला सारे जग हे खोटे
पावन पावन गुरू तुझे धाम
करू तुझी पूजा घेऊ तुझे नाम...
गुरू माझे विट्ठल गुरू माझे प्राण
विरहात येता बापू असे गान
नाम तुझे घेता जावे माझे प्राण
करू तुझी पूजा घेऊ तुझे नाम...
गुरू दर्शनाने भरूनी ह्रदय
प्रेमात जाहली आसवे उदय
गुरू चरणी आहे माझे चार धाम
करू तुझी पूजा घेऊ तुझे नाम...
No comments:
Post a Comment