आम्ही साधक नाही हलणार
हर भक्कम टक्कर देणार
अरे आहे पाठीशी हात माझ्या
गुरूरावाचा गुरूदेवाचा
मोक्ष द्वाराची भेटली वाट
आहे विश्वास होईल पहाट
वाटेत काटे येवो दाट
नाही करणार पिछेहाट
अरे पुढे तर आम्ही जाणार
अर्ध्या रसत्यात नाही थांबणार
अरे आहे पाठीशी हात माझ्या
गुरूरावाचा गुरूदेवाचा
आहे निंदक मतिमंद
अकलेचे तर द्वारच बंद
कसे सुटणार मायेचे फंद
डोळे असून आहेत अंध
अशा अंधांचे डोळे उघडणार
त्यांचे अकलेचे द्वार खोलणार
अरे आहे पाठीशी हात माझ्या
गुरूरावाचा गुरूदेवाचा
संत शरणी जे पण गेले
ते खरोखर तरुन गेले
संत निंदक जे पण झाले
अंती काळे तोंडच झाले
श्रीकृष्ण पण संतांना सेवतात
श्रीराम पण संतांना पुजतात
अरे आहे पाठीशी हात माझ्या
गुरूरावाचा गुरूदेवाचा
प्रलोभनांला वावच नाही
कशी ही मस्ती ठावच नाही
पुढे भले होवो काही
याची आम्हा चिंता नाही
आम्ही मस्तीत आमच्या राहणार
आम्ही वेड्याना वेडे वाटणार
अरे आहे पाठीशी हात माझ्या
गुरूरावाचा गुरूदेवाचा
No comments:
Post a Comment