आले करुणेचे अवतार
बापू नारायण साकार
उदार ह्रदय दिलदार
करी भक्तानां भवपार
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठला...
जणू खरोखर मानव आहे
अशी तर लीला करतात
करुणेची तर खाणच आहे
रोग शोक भय हरतात
आले कोणी दीन दुःखी
त्याला करी निहाल
आले करुणेचे अवतार...
त्रेतायुगी राम बनूनी
केला दुष्टांचा संहार
द्वापरयुगी कॄष्ण बनूनी
दिले प्रेम आणि ज्ञान अपार
कलियुगात होऊन आले
बापू आसाराम
आले करुणेचे अवतार...
ब्रह्मा विष्णु रूद्र स्वरूप
तिघांचे तुम्ही एकच रूप
मनोहर मूर्ती आनंद रूप
पाहतो मी त्रिभुवन रूप
दर्शन आपुले करता मला
होतो आनंद अपार
आले करुणेचे अवतार...
साधन भजनी मन लावूनी
जीवन आपुले तू सुधार
सद्गुरुंच्या शरणी येऊन
कर आपुला तू उद्धार
येणार नाही पुन्हा मौका
इतके याद राख
आले करुणेचे अवतार...
आपल्या नावाचे ऐकून सूर
षड्रिपू तर होतात दूर
आशा तृष्णांचा करा नाश
तुझ्या दर्शन ची एक आस
एकच मागणी आहे मला
दर्शन वारंवार
आले करुणेचे अवतार...
No comments:
Post a Comment