खोट्या मायेचे हे रंग खोटे
गुरू भक्तीचा रंग खरा हो
खऱ्या रंगात रंगू चला हो
गुरू रंगात रंगू चला हो
गुरू ज्ञानाची पिचकारी मारे
क्षणात हरतात हे पाप सारे
तप्त ह्रदय हे शीतल करा हो
गुरू रंगात रंगू चला हो
गुरू गुरू मनाने गाऊ
गुरू चरणी हे मन लावू
गुरू ज्ञानाचा गंगेश्वरा हो
गुरू रंगात रंगू चला हो
गुरूवर आहे कॄष्ण मुरारी
आम्ही आहोत त्यांचे पुजारी
पजतात अमृत अधरा हो
गुरू रंगात रंगू चला हो
नाही मिळणार कोठे हा रंग
होऊन जातील भवभय भंग
चला चला तर त्वरा करा हो
गुरू रंगात रंगू चला हो
No comments:
Post a Comment