किती दयाळू किती कृपाळू किती उदार तू
माझ्या गुरुदेवा
किती मायाळू किती प्रेमाळू किती दिलदार तू
मझ्या गुरूदेवा....
तुझ्या या नामाची महिमा आहे भारी
ऐकून हे तुझे नाम आलो तुझ्या दारी
दिसते निःसार सर्व संसार
कर मला भवपार तू
मझ्या गुरूदेवा...
धरा व नभात तू, कणाकणात तू
मझ्या मनात तू बस एकच नाथ तू
इकडे तिकडे आता चोहिकडे
दिसतो तूच तू
मझ्या गुरूदेवा...
ज्ञान ध्यान मला काही नाही ठावं
एकच येते मना बस तुलाच पहावं
करनी दर्शन जीवन अर्पण हृदय दर्पण
मझ्या गुरूदेवा....
No comments:
Post a Comment